Fri. Sep 20th, 2019

इस्रोचे प्रमुख के सिवन यांचा ‘असा’ जीवन प्रवास

0Shares

देशात सर्वांसांठी महत्त्वाचे मोहिम चांद्रयान-2 यशस्वीरित्या चंद्रावर उतरण्याच्या काही क्षणापूर्वी संपर्क तुटल्यामुळे वैज्ञानिकांसह प्रत्येक भारतीयाला दु:ख झाले. मात्र सर्वात जास्त दु:ख झाले ते इस्रोचे प्रमुख के सिवन. चंद्रावर उतरण्याच्या काही क्षणापूर्वी संपर्क तुटल्यामुळे के सिवन यांच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीला थोड्याकरीता यश मिळाले नाही म्हणून सिवन यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रोमध्ये प्रमुख असणारे के सिवन यांचा कसा आहे जीवन प्रवास जाणून घ्या.

इस्रो प्रमुख ‘के सिवन’ यांचा जीवन प्रवास –

14 एप्रिल 1957 रोजी के सिवन यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला.

तामिळनाडूतील सरकारी शाळेत तामिळ माध्यमातून त्यांनी शालेय शिक्षण घेतले.

पूर्वीपासूनच अभ्यासाची गोडी असल्यामुळे के सिवन हे कुटुंबातील पहिलेच पदवीधर आहेत.

त्याचबरोबर विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे सिवन माजी संचालक आहेत.

के सिवन यांना रॉकेट मॅन म्हणून ओळखले जाते.

नागरकोईलमधल्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली.

1980 मध्ये ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून त्यांनी एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

बंगळुरुतील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात 1982 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) मिळवली.

आयआयटी बॉम्बेमधून 2007 मध्ये त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *