Sun. Sep 19th, 2021

चांद्रयान-2चे प्रक्षेपण इस्रोने केले रद्द

काही तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान -2 चे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. तसेच चांद्रयान-2 चे प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चांद्रयान-2 सोमवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनीटांनी अवकाशात भरारी घेणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण रद्द केल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

भारताच्या महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तात्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आले आहे.

तसेच लवकरच प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो जाहीर करणार आहे.

चांद्रयान-2 सोमवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनीटांनी अवकाशात भरारी घेणार होते.

भरारी घेतल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्रावर दाखल होणार होते.

त्यामुळे भारतासाठी हे महत्वाचे मोहीम असून संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले होते.

चांद्रयान-2 मोहीम चंद्रावर खनिजांचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे.

विशेष म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 संशोधन करणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *