Sun. Jun 20th, 2021

लष्करी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा

चंदू चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय सैन्य दलात खळबळ

भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानामध्ये शिरणारे भारतीय सैन्य दलातील 37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात चंदू चव्हाण यांनी एक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. लष्करातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे चंदू यांनी व्हिडीओमध्ये स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

चंदू चव्हाण भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.

2016 साली भारतीय लष्कराच्या पराक्रमी जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.

या सर्जिकल स्ट्राईकचा भाग म्हणून चंदू चव्हाण पाकिस्तानात शिरले होते.

पाकिस्तानच्या तावडीत असताना त्यांची सुटका करण्यासाठी भारताने अथक प्रयत्न केले.

3 महिने 21 दिवस पाकिस्तानात राहिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात भारताला यश मिळाले होते.

आपल्या मायदेशी परतल्यानंतर आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले.

त्याचबरोबर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोस्टबाबत, सुट्यांबाबत मागणी केल्यानंतर त्यावरही दुर्लक्ष होत असल्याचे चंदू यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांपासून सतत अधिकाऱ्यांकडे अनेक मागण्या केल्यानंतरही पूर्ण होत नसल्यामुळे कंटाळून राजीनामा दिल्याचे समजते आहे.

पाकिस्तानहून परतल्यानंतरही आपला छळ करत असून न्याय मिळत नसल्यामुळेही राजीनामा दिल्याचे चंदू यांनी सांगितले.

चंदू चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भारतीय सैन्य दलातील अधिकारी काय निर्णय घेतात यावर अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *