Mon. Dec 6th, 2021

विनेश फोगाटने सांगितला आपल्या यशाचा मंत्र!

ऑलिम्पिक निकषांसाठी खेळण्यास पात्र ठरलेल्या विनेश फोगटने आपल्या यशाचा मंत्र सांगितलाय. ‘दंगल’साठी नावाजलेल्या फोगट कुटुंबातील एक असणाऱ्या विनेशने सारा अ‍ॅन हिल्डेब्रँड हिच्याशी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात कोणता डाव खेळून विजय मिळवला, याचा गौप्यस्फोट केलाय.

प्रशिक्षकांचा सल्ला न मानताही विजय!

सामना खेळताना प्रतिस्पर्ध्याची ताकद आणि कमजोरी दोन्ही समजून घ्याव्या लागतात.

विनेश फोगाटचे प्रशिक्षक वुलर अकोस यांनी विनेशला खेळत असताना सारा अ‍ॅन हिल्डेब्रँडपासून दूर राहायला सांगितलं होतं.

तसंच तिचा उजवा हात जखडून ठेऊन पायावर हल्ला करण्याचा सल्ला दिला होता.

पण मैदानात त्यांनी सुचवलेल्या डावपेचाचा अवलंब न करता तिने काही वेगळंच केलं आणि त्यात ती यशस्वी झाली.

विनेशने तिच्या पायावर हल्ला करण्याऐवजी स्वतःचा बचाव केला.

साराच्या क्षमतेची विनेशला जाणीव होती. तिला पिछाडीवर पडणं विनेशचा खेळ बिघडवू शकलं असतं.

त्यामुळे विनेशने आयत्यावेळी आपला डाव बदलला. त्याचा अपेक्षित परिणाम झाला.

साराने सर्व शक्ती लावूनही, तिचे डावपेच यशस्वी ठरले नाहीत आणि यश विनेशच्या पदरात पडलं.

प्रशिक्षक अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने सर्व विचार करून डाव आखत असतात. मात्र मैदानात उतरल्यावर ते सराव केलेले डाव यशस्वी होतील की नाही, याची खात्री नसते. उलट एकदा सामन्याला सुरुवात झाली की खेळाडूला अंदाज येऊ लागतो की प्रशिक्षकांनी शिकवलेले डावपेच या सामन्यात योग्य ठरतील की नाही. त्यामुळे अवधान बाळगत आयत्यावेळी योग्य निर्णय घेऊन आपला बचाव केला. हेच आपल्या या सामन्यातील यशाचं रहस्य असल्याचं विनेश फोगटने म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *