Tue. Jun 18th, 2019

#HappyBirthdayCharlieChaplin ‘असा’ होता चार्ली चॅप्लिन

19Shares

शब्दांशिवाय लोकांना हसवणारा चार्लस स्पेन्सर चॅप्लिन अर्थात चार्ली चॅपलिन याचा जन्मदिवस आहे. 16 एप्रिल 1889 रोजी चार्ली चॅप्लिनचा जन्म झाला. वैयक्तिक आयुष्याची शोकांतिका असतानाही जगाला हसवण्याची ताकद ठेवणारा तसेच फक्त अभिनयाच्या जोरावर लोकांना हसवणारा अशी त्याची ओळख प्रसिद्ध आहे. सदैव हसरा चेहरा, भिरभिरणारे डोळे, छोटीशी मिशी आणि फक्त चेहऱ्याच्या हावभावावर असंख्य लोकांचे मनं जिंकणारा म्हणजेच चार्ली चॅप्लिन.

 

स्वत:चे रडू न दिसण्यासाठी पावसात रडणारा चार्ली

अभिनय, संगीत, दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तो आपल्या समोर आला.

World Warच्या काळात जगाला हसवण्याचे काम त्यांनी चोख बजावले.

‘This Is My Song’ या  चित्रपटाला १९७२ चा अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वयाने मोठा असतानाही, त्याच्या अभिनयाने दिग्गज असतानाही तो आजच्या आणि येणाऱ्या नव्या पिढीचा लाडका ‘चार्ली’ च राहणार.

चार्ली चॅप्लिन आणि गांधीजींची भेट:

चार्ली चॅप्लिन आणि महात्मा गांधी अशा अभिनय क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील दोन दिग्गजांची भेट ही एक ऐतिहासिक भेट आहे.

लंडनमध्ये झालेल्या या भेटीबाबत चार्लीने आपल्या डायरीमध्ये लिहिले आहे.

या भेटीमध्ये त्यांच्या संभाषणादरम्यान गांधीजींनी आधुनिक काळात यंत्रामुळे माणसाचे शोषण होते, असा संदर्भ आला होता.

त्यातून चार्ली चॅप्लिनच्या ‘Time Machine’ या सिनेमाचा जन्म झाला.

जेव्हा चार्ली चॅप्लिनचा मृतदेह चोरीला जातो…

चार्ली चॅप्लिनचा २५ डिसंबर १९७७ मध्ये मृत्यू झाला.

अखंड आयुष्यभर वेदना सहन केल्यानंतर त्याच्या मृतदेहालाही यातना सहन कराव्या लागल्या.

मृत्यूनंतर मृतदेह पुरलेल्या ठिकाणावरून अचानक गायब करण्यात आला होता.

शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह काही दिवसांनी तळ्याजवळ सापडला होता.

तेव्हा त्याच्या पार्थिवाला सहा फूट खाली दफन केले गेले.

 

19Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *