Sat. Oct 1st, 2022

‘छत्रपती’ उपाधीचा मान राखला पाहिजे; रोहित पवार यांचं फेसबूकवर पोस्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत आहे. भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मात्र उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशामुळे त्यांच्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे.

‘छत्रपती’ या उपाधीचा मान राखला पाहिजे’ अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो.

उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्त्वाची वाटते.

पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात आलं.

मात्र तो कार्यक्रम एका नेत्याच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो.

भाजपा पक्षाला मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे.

कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो, तसाच आपणही तो मान ठेवावा”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी हजर नसल्यामुळे छत्रपती या उपाधीचा मान राखला नसल्याचे रोहित पावर यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.