Tue. Oct 26th, 2021

छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान

 

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सुकमा जिल्ह्यातील बीमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाल्याचे समजते आहे. सीआरपीएफच्या कोबरा 201 बटालिअनची तुकडी गस्ती घालत असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षाकांवर गोळीबार केला. तसेच सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रत्युत्तक देत गोळीबार केला.

नेमकं काय घडलं ?

छत्तीसगडच्या सुकमा येथे नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली.

या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

सुकमा जिल्ह्यातील बीमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली.

सीएरपीएफच्या कोबरा 210 बटालिअनची तुकडी गस्ती घालत होती.

यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली.

त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाने चार नक्षलवाद्यांना ठार केले.

सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री रायफल जप्त केले आहे.

गोळीबार थांबल्यानंतरही सुरक्षा रक्षकांची शोध मोहिम सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *