Sun. May 31st, 2020

नक्षल्यांचं आत्मसमर्पण….

जय महाराष्ट्र न्युज, छत्तीसगड 

गडचिरोलीतील मोठ्या कारवाईनंतर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. नारायणपूर जिल्ह्यात 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांमध्ये 40 तरुण आणि 20 तरुणींचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या नीतीला कंटाळून या सर्वांनी नक्षलवादी संघटनांचा हात सोडून सरेंडर करण्याचा निर्णय घेतला. सरेंडर करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना शासनाकडून मदत आणि पुनर्वसन योजनेचा फायदा मिळणार आहे. 

मोठं बक्षीस असलेल्या दोन दलम कमांडरचा यात समावेश आहे. नारायणपूर क्षेत्र गडचिरोलीच्या बोरिया परिसराजवळ आहे. कारवाईच्या भीतीनं या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *