Mon. Oct 25th, 2021

‘ती’ घोषणा बदला!, चौकीदारांची राहुल गांधींकडे मागणी!

‘सर्व चौकीदार हे चोर नाही,पण देशाचा चौकीदार आहे’, अशी जहरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.  देशभरातले चौकीदार चोर नाहीत, मात्र स्वतःला देशाचा चौकीदार संबोधणारे पंतप्रधान चोर आहेत, असं राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. काँग्रेसच्या रॅलीमध्ये ते बोलत होते. हवाई दल देशाचं रक्षण करत असताना मोदींनी तीस हजार कोटी रुपये चोरून अंबानींना दिले, असा आरोप त्यांनी केला आहे.

चौकीदारांच्या आक्षेपावर काय म्हणाले रागा?

आपल्याकडे अनेक चौकीदार येऊन‘चौकीदार चोर है ‘, या घोषणेबद्दल तक्रार करतात.

‘आम्ही चोर नाही’, हे पटवून देतात.

तुम्ही ही घोषणा बदला,अशी विनंती करतात.

मी त्यांना आश्वासन देतो, की काळजी करू नका.

सर्व देशाला माहीत आहे, की कोणता चौकीदार चोर आहे.

‘चौकीदार चोर है’ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उद्देशून केली जाते.

राफेलवरून मोदींना टार्गेट!

राहुल यांनी राफेल करारावरून मोदींना टार्गेट केलं.

हवाई दल देशाचे रक्षण करते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाकडून तीस हजार कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने घेतले.

पंतप्रधान मोदी यांनी 3.5 लाख कोटी रुपयांचे उद्योगपतींचे कर्ज माफ केलं.

पण शेतकरी, विद्यार्थी आणि दुकानदारांचं कर्ज माफ केलं नसल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

आमची सत्ता आली की, सर्वांना किमान हमी रक्कम मिळेल आणि ते पैसे थेट गरिबांच्या खात्यात जमा केले जातील, असेही ते म्हणाले होते.

पण त्याचं काय झालं?

चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत आर्थिक विकास घटल्याबद्धल राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं.

‘चुकीची आश्वासने, चुकीच्या खेळी. चौकीदाराला तिमाहीमध्ये पुन्हा एकदा अपयश आले.’ असे राहुल यांचं म्हणणं आहे.

डिसेंबर 2018 च्या शेवटच्या तिमाहीत भारताचा विकासदर 6.6 टक्क्यांवर आल्याचंही त्यांनी म्हटलंय.

पंतप्रधानांचा कार्यकाळ संपत आला असून सर्व प्रकारचा गोंधळ करूनही अर्थव्यवस्था खालावतच चालली आहे, असं राहुल यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *