Fri. Dec 3rd, 2021

पत्नीशी खोटं बोलून गर्लफ्रेंडसोबत गेला इटली फिरायला, #Coronavirus चा फटका बसला

Getty Images-iStockphoto

आपल्या पत्नीशी खोटं बोलून गर्लफ्रेंडसोबत इटलीला (Husband roaming around in Italy with Girlfriend) फिरायला गेलेल्या एका बेइमान पतीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला आता रुग्णालयात दाखल होऊन कोरोनाशी (Corona in Italy) झुंज द्यावी लागत आहे.

इटलीमध्ये आपल्या प्रेयसीसोबत फिरायला गेलेल्या या इसमाने आपण कुणासोबत कुठे जात आहोत, याबद्दल पत्नीपासून दडवून ठेवलं होतं. (Husband cheated on wife) तो आपल्या पत्नीला खोटं सांगून प्रेयसीसोबत इटलीला आला. मात्र इटलीमध्ये कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गाचा फटका या इसमाला बसला. त्यालाही कोरोनाची (Corona Virus) लागण झाली. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या वृत्तानुसार संबंधित इसम 30 वर्षांचा असून त्याला आता वेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र यासंदर्भात त्याच्या पत्नीला अद्याप कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. हा इसम मूळचा इंग्लंडमधील आहे. पत्नीशी खोटं बोलून प्रेयसीला घेऊन इटलीमध्ये हा फिरायला गेला होता. मात्र त्याला तेथए कोरोनाची लागण झाली. इंग्लंडला परतल्यावर आता पत्नीला तो याबद्दल सांगू शकत नव्हता. त्यामुळे स्वतःच पब्लिक हेल्थ कॉर्डिनेटरला भेटायला गेला आणि आपण इटलीहून आल्याचं त्याला सांगितलं. त्यानंतर त्याची चाचणी केली, तेव्हा तो कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं.  

यासंदर्भात डॉक्टरांनी या पुरुषाची चौकशी केली असता आपले एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचं त्याने कबूल केलं. आपण आपल्या प्रेयसीला घेऊन इटलीला फिरायला गेलो होतो, हेदेखील त्याने कबूल केलं. मात्र याबद्दल आपल्या पत्नीला काही सांगू नका, अशी विनंती त्याने डॉक्टरांना केली.

त्यामुळे सध्या कोरोनावर त्याचे उपचार सुरू असले, तरी यातून वाचल्यानंतर जर त्याच्या पत्नीला कोरोना होण्याचं कारण समजलं, तर मात्र त्याची काही धडगत नाही, हे देखील खरं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *