तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण आग, तीन बंब घटनास्थळी दाखल

पालघर : कोरोना काळात रुग्णालय, इमारती, कारखाने अशा अनेक ठिकाणी आग लागच्या घटना समोर येत आहे. आता यात आणखी एका घटनेची भर पडली असून ही घटना तारापूर औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकर भीषण आग लागली. तसेच मोगळ्या जागेत असलेले पाईपही या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू होते आणि यात अग्निशमन दलाचे यश मिळालं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अग्नी तांडव सुरूच आहे.

प्राथमिक माहितीनुसार, औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनी शेजारी उभ्या असलेल्या एका केमिकल टँकरने अचानक पेट घेतला. त्यानंतर मोकळ्या जागेत असलेल्या पाईपलाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन वाहने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केला. पाण्याचा फरावा केल्यानंतर आगी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version