Sun. Sep 22nd, 2019

देशभरातील 9 लाख केमिस्ट आज संपावर

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

आज देशभरातील सर्व मेडिकल बंद असणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टकडून एक दिवसाचा संप पुकारण्यात आला. मध्यरात्री 12 वाजेपासून या संपाला सुरूवात झाली आहे.

 

औषधांच्या विक्रिवर सरकारकडून लावण्यात आलेले कडक नियम शिथिल करावे, तसंच ऑनलाईन फार्मसीविरोधात राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला. इतकंच नाही, तर औषधांच्या होणाऱ्या ऑनलाइन विक्रिवरसुद्धा मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला आहे.

 

तसेच, सरकार आपल्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं असल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर सरकारच्या विरोधात निदर्शनंसुद्धा केली जाणार आहेत. त्यामुळे या संपाचा फटका मात्र सर्वसामान्यांना जास्त बसणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *