30 मे रोजी देशातील सर्व मेडिकल राहणार बंद
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
येत्या 30 मे रोजी देशातील सर्व मेडिकल बंद असणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टकडून एक दिवसाचा संप पुकारण्यात आला.
29 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून या संपाला सुरूवात होणार आहे. औषधांच्या विक्रिवर सरकारकडून लावण्यात आलेले कडक नियम शिथिल करावे, या मागणीसाठी हा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला.
इतकंच नाही, तर औषधांच्या होणाऱ्या ऑनलाइन विक्रिवरसुद्धा मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. तसेच, सरकार आपल्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं असल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर सरकारच्या विरोधात निदर्शनंसुद्धा करण्यात येतील. त्यामुळे या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना जास्त बसेल.