Thu. Apr 18th, 2019

IPL 2019: चेन्नईची कोलकातावर 7 गडी राखून मात

10Shares

कोलकाता विरुद्ध चेन्नई या सामन्यात चेन्नईने कोलकातावर 7 गडी राखून मात केली आहे. 20 षटकात केवळ108  धावांच आव्हान कोलकाताने चेन्नईसमोर ठेवले होते. तर चेन्नईने 109 धावांचे आव्हान 7 गडी राखून पुर्ण करत कोलकातावर विजय मिळवला आहे.

कोलकाताच्या 20 षटकात केवळ 108  धावा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताचा सलामीवीर ख्रिस लिन शून्यावर माघारी गेला.

सुनील नरिनला 6 धावांवर झेलबाद झाला तर नितीश राणा  शून्यावर बाद झाला.

रॉबिन उथप्पाही  2 चौकार लगावत 11 धाव करून तो माघारी परतला.

कर्णधार दिनेश कार्तिकक पण फटकेबाजीच्या प्रयत्नात 21 चेंडूत 19 धावा काढत झेलबाद झाला.

शुभमन गिल त्याने 9 धावा काढून बाद झाला.

पियुष चावला त्याने 13  चेंडूत 8 धावांमध्ये माघारी गेला.

कुलदीप यादव (0 ) धावचीत झाला. तर  प्रसिध देखील (0) झेलबाद झाला.

रसलने एकाकी झुंज देत 44 चेंडूत 50 धावा केल्या. आणि कोलकाताने 20 षटकांत 9 बाद 108 धावा केल्या.

चेन्नईचा सहजच विजय

नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

109 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना  सलामीवीर शेन वॉटसन  9 चेंडूत 17  धावा काढत बाद झाला.

सुरेश रैनालाही  14 धावांवर नरिनने झेलबाद केले.अंबाती रायडूने संयमी खेळी करत 31 चेंडूत 21 धावा केल्या.

सलामीवीर फाफ डु प्लेसिसने उत्तम फलंदाजी करत 43 धावांची नाबाद खेळी केली.

चेन्नईने 109  धावांचे आव्हान 7 गडी राखून पुर्ण करत कोलकातावर विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *