Wed. Oct 27th, 2021

IPL2019: दिल्लीला नमवून चेन्नई अंतिम फेरीत

आयपीएलच्या १२ व्या हंगामातील सेकंड क्वालिफायर सामना विशाखापट्टणम येथे झाला. चेन्नईने धडाकेबाज फलंदाजी करत आपले स्थान निश्चित केले आहे. क्वालिफायर २ सामन्यात चेन्नईने दिल्लीच्या संघावर 6 गडी राखून मात केली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. चेन्नईने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कररण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 147 धावांच आव्हान चेन्नईसमोर ठेवले होते.

दिल्लीचे 147 धावांच आव्हान

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात अतिशय वाईट झाली.

यामध्ये दिल्लीच्या एकाहूी फलंदाजाला आपलं अर्धशतक सुद्धा पुर्ण करता आलं नाही.

सलामीवीर पृथ्वी शॉ पक्त 5  धावांवर बाद झाला.

शिखर धवनही 14 चेंडूत 18 धावा काढल्या आणि तो झेलबाद झाला.

कॉलिन मन्रो देखील 27  धावा करुन बाद झाला.

कर्णधार श्रेयस अय्यरने 18 चेंडूत 13  धावा केल्या.

दिल्लीने 20 षटकांत 9  बाद 147  धावा केल्या.

चेन्नईची यशस्वी खेळी

दिल्लीने दिलेल्या आव्हान पेलताना चेन्नईने आक्रमक खेळी केली.

सलामीवीर शेन वॉटसन आणि फॅफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी केली.

फॅफ डू प्लेसिसने 39 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये त्याने 7  चौकार आणि1  षटकार मारला.

त्यानंतर शेन वॉटसन देखील अर्धशतक करुन माघारी परतला. त्याने 32  चेंडूत50५० धावा केल्या.

मात्र, सुरेशा रैना स्वस्तात परतला. त्याने 13  चेंडूत 11 धावा केल्या.

यानंतर महेंद्र सिंह धोनीने अंबाती रायडू सोबत डाव सावरत चेन्नईला विजय मिळवून दिला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *