Sun. Aug 18th, 2019

कोट्यवधीची अश्व विक्री होणाऱ्या ‘चेतक’ महोत्सवाला सुरुवात

0Shares

साडे तीनशे वर्षांहुन अधिकची परंपरा असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली. यंदा पहिल्यांदाच हा महोत्सव महिनाभर चालणार आहे. पुढच्या २८ दिवसांत याठिकाणी अश्वसौंदर्य, अश्वनृत्य आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून देशी-विदेशी पर्यटकांसाठी खास व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दरवर्षी या बाजारात कोट्यवधींच्या अश्व खरेदी विक्रीची उलाढाल होते.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते या महोत्सावाचे उद्घाटन करण्यात आलं.दरवर्षीप्रमाणे यंदाही मारवाड, सिंध पंजाब येथील विविध उमद्या जातीचे तगडे घोडे या बाजारात पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. यानिमित्ताने खान्देशातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा अश्वमहोत्सव देशातील प्रसिद्ध महोत्सवापैकी एक असल्याने देशभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे उपस्थिती लावतात. या महोत्सवात गुजरात,उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातून 2500 पेक्षा अधिक घोडे प्रदर्शनासाठी आणण्यात आले आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *