Thu. Jun 17th, 2021

चेतन भगतवर नेटकरी संतापले

देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती आहे. कोरोनामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यातच अनेक सेलिब्रिटी एकामेंकावर टीका करत असल्याचं चित्र हे रोज बघायला मिळत आहे. मात्र यावेळी लेखक चेतन भगत यांनी थेट रामदेव बाबांवर टीका केली आहे. रामदेव बाबा यांची कोविड-१९ वरील उपचारासाठीची पतंजली Patanjali या संस्थेकडून ‘कोरोनिल’ Coronil हे औषध २३ जून रोजी लाँच करण्यात आलं होती. कोरोनावर हे औषध उपयोगी आहे की नाही हे आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही. मात्र आता लेखक चेतन भगत Chetan Bhagat यांनी त्या औषधावरून ट्विट केल्याने ट्रोल झाले आहेत. ‘खरंच गमतीशीर आहे हे, मी अजूनपर्यंत एकही ट्विट पाहिलं नाही, ज्यात कोरोनिलची तातडीने गरज आहे असं म्हटलंय’, असं ट्विट चेतन भगत यांनी केलं.

या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. कोरोनिलवर टीका करणाऱ्या चेतन भगत यांच्या पुस्तकांवरून नेटकऱ्यांनी त्यांना टोला लगावला आहे. कोरोनिलचं सोड पण कोणी तुझी पुस्तकं तरी मागितली आहेत का’, असा उपरोधिक सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तर काहींनी इतरांवर टीका करण्यापेक्षा गरजूंची मदत कर, असा सल्ला भगत यांना दिला आहे. ‘हे तर अजूनही मजेशीर आहे, मी एकही ट्विट पाहिलं नाही, ज्यात म्हटलंय की चेतन भगतचं पुस्तक वाचतोय’, अशा शब्दांत नेटकऱ्याने त्यांना डिवचलं आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीने अवघ्या ४ महिन्यांत ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किटची विक्री केली असून कंपनीच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत औषधांच्या विक्रीतून सुमारे २४१ कोटी रुपयांची कमाई झाली तर कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 18 ऑक्टोबर ते 23 जून दरम्यान एकूण 23.54 लाख कोरोनिल किटची विक्री झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *