Fri. Aug 6th, 2021

‘आरक्षण गेलं खड्ड्यात! शिक्षण मोफत करा!’, छत्रपती संभाजी महाराजांचं Tweet!

उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली. या घटनेने व्यथित होऊन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी उदिग्न प्रतिक्रिया ट्वीटरवर दिली आहे.

आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, असं Tweet करतानाच  आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष असल्याचं ते म्हणाले. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षं पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे सवाल त्यांनी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *