Mon. Jan 24th, 2022

‘मेट्रोची गरज आहे का?’ भुजबळांच्या प्रश्नाने फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात

नाशिक मेट्रो (Metro) संदर्भात पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज असल्याचे वक्तव्य कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलंय. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नाशिक मेट्रो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री असताना नाशिक मध्ये टायर बेस मेट्रो सुरू करण्याचा निर्णय फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतला होता.

मात्र, या मेट्रोची शहराला खरंच आवश्यकता आहे का अस प्रश्न उपस्थित करत मेट्रो संदर्भात पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज असल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय.

त्यामुळे नाशिक मेट्रोचा (Metro Neo) प्रकल्प लांबणीवर पडण्याची चर्चा शहरात सुरू झाले आहेत. अत्यंत मोठ्या थाटामाटात नागपूर मेट्रो (Nagpur Metro) सुरू करण्यात आला. पण या मेट्रोची काय परिस्थिती आहे हे तुम्हीच पहा असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

भाजपची भूमिका

दरम्यान महापालिकेतील सत्ताधारी भाजपा (BJP) मात्र मेट्रो प्रकल्प सुरू करणारच असं म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

शहरांचा विकास करायचं असेल तर मेट्रो गरजेची आहे. हा मेट्रो प्रकल्प सुरू व्हावा यासाठी पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावणारच अशी भूमिका भाजपने घेतली.

एकूणच मेट्रो प्रकल्पामुळे भुजबळ विरुद्ध भाजप असा संघर्ष येणाऱ्या काळात होण्याची शक्यता दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *