नाशिकसाठी भुजबळांची ‘कृष्णकुंज’वर शिष्टाई?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे सहपरिवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले. साधारण 18 ते 19 वर्षं शत्रूत्व असणाऱ्या या नेत्यांमध्ये आता चांगलीच दिलजमाई झाल्याचं दिसू लागलंय. तसंच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेसाठी ही भेट असावी का, असा अंदाजही व्यक्त केला जातोय.
भुजबळ आणि राज यांच्यात दिलजमाई?
मात्र तीन वर्षांपूर्वी भुजबळ यांनी राज यांच्या ‘मातोश्री’ कुंदा ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर येऊन प्रकृती विचारपूस केली होती.
त्यावेळी भुजबळ भ्रष्टयाचारांच्या आरोपात पुरते अडकले होते.
MET चे सुनील कर्वे यांनीच भुजबळ यांना अडचणीत आणले होते.
त्यामुळे भुजबळ यांची ती भेट पडद्याआडून मदतीसाठी मानली गेली होती.
बेहिशोबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा भुजबळ यांना जामीन मिळत नसताना राज ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.
भेट केवळ स्नेहभोजनासाठी?
राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर भुजबळ कुटुंबियांसह पहिल्यांदा गेले आहेत.
पत्नी, मुलगा पंकज, पुतण्या समीर यांच्यासह ते ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले.
भुजबळ राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
पण तिथे कुटुंबियांशी मनमोकळेपणाने गप्पा न मारता आल्याने ते स्नेहभोजनासाठी ‘कृष्णकुंज’वर गेले आहेत.
‘मातोश्री’वरही भुजबळांनी संपवलेलं राजकीय वैर?
याआधी भुजबळांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी कुटुंबियांसह “मातोश्री”वर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.
बाळासाहेबांविरोधात न्यायालयात दाखल केलेला दावा त्यांनी मागे घेतला होता.
दावा मागे घेत त्यांनी बाळासाहेबांशी असलेले राजकीय वैर संपुष्टात आणलं होतं.