Jaimaharashtra news

आश्रमशाळांचा थांबलेला धन्यपुरवठा पुन्हा सुरू करा, छगन भुजबळ यांची मागणी

राज्यातील अनुदानित आश्रमशाळांना गेल्या 5 महिन्यांपासून धान्यपुरवठा बंद आहे. केंद्र सरकारकडून अनुदानित आश्रमशाळांना 4 रुपये दराने गहू आणि 6 रुपये दराने तांदुळाचा पुरवठा केला जात होता. हा धान्य पुरवठा पुन्हा सुरू व्हावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केली आहे.

राज्यात 2290 संस्था आहेत.

त्यात 2 लाख 19 हजार मुलं मुली लाभार्थी विद्यार्थी आहेत.

मात्र काही महिन्यांपासून आश्रम शाळांना धान्य पुरवठा होत नसल्याने संस्था चालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

वार्षिक 39 हजार मेट्रिक टन एवढं धान्य हे राज्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी पुरवला जायचा.

हा धान्य पुरवठा पुन्हा सुरू व्हावा यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकार कडे पत्राद्वारे मागणी केलीय.

Exit mobile version