Thu. Jan 27th, 2022

छगन भुजबळ यांचं युतीच्या निर्मला गावित यांना ‘ऑल द बेस्ट’!

नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदार संघातून युतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजप कार्यकर्त्यांसोबत रॅली काढत शक्तिप्रदर्शन करत सीमा हिरे यांनी अर्ज दाखल केला असला तरी शिवसेनेचा एकही नगरसेवक यावेळी सीमा हिरे यांच्या सोबत नव्हता. त्यामुळे स्थानिक पातळीवरील भाजप सेनेतील संघर्ष तीव्र झालाय. बंडाळी चांगलीच वाढली असून युतीच्या हिरे यांच्यावर नाराजची ग्रहण कायम आहे.

नाशिकच्या मध्य मतदार संघातून युतीच्या देवयानी फरांदे यांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

फरांदे यांच्या सोबत भाजपकडून इच्छूक उमेदवार होते त्यापैकी अर्ज भरतांना फरांदे यांच्या सोबत कोणीही उपस्थित नव्हते.

वसंत गीते उपस्थित नसल्यानं मध्य मधील बंडाळीचा सस्पेन्स कायम आहे.

फरांदे यांच्या सोबत शिवसेनेचे नगरसेवकही उपस्थित नव्हते.

मात्र गीते काय भूमिका घेतात यापूर्वीच फरांदे यांनी त्यांची नाराजी दूर केलीय जाईल असा विश्वास व्यक्त केलाय.

नाशिकच्या इगतपुरी मतदार संघातून युतीकडून निर्मला गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

मात्र शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडाची भूमिका घेतल्यानं गावित यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय.

इतकंच काय तर नाराजांशी वरीष्ठ नेते बोलत असून लवकर नाराजी दूर केली जाईल असा विश्वास व्यक्त केलाय.

यावेळी मात्र छगन भुजबळ प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.

त्यावेळी गावित यांनी भुजबळांकडे जात चरणस्पर्श करत नमस्कार केला.

त्याच वेळी भुजबळांनी ‘ऑल द बेस्ट’ म्हंटल्यानं भुजबळांचा पाठिंबा नेमका कुणाला यावरून चर्चा रंगल्या होत्या.

मात्र वरीष्ठ असल्याने मी त्यांना नमस्कार केल्याचं गावित यांनी स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *