Mon. Dec 6th, 2021

…म्हणून छत्रपती संभाजीराजे संतापले, कांँग्रेसकडे मागितला खुलासा

मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवल्याचा प्रकार घडला. यामुळे या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध आणि संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

शहरात वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या कारणाने अर्धपुतळा चौथरा हटवण्यात आला होता. या सर्व प्रकरणामुळे छत्रपती संभाजीराजे संतापले आहेत.

छत्रपती संभाजीराजेंनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी याबाबतीत मध्य प्रदेश सरकारकडे खुलासा मागितला आहे.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. या प्रकरणी छत्रपती संभाजीराजांनी मध्यप्रदेश काँग्रेस सरकार आणि पक्षाच्या अध्यक्षांकडे याबाबतीत खुलासा मागितला आहे.

जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असंही छत्रपती संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

शिवाजी महाराजांची मूर्ती सन्मानजनक पद्धतीनेही काढता आली असती. अशा क्रूर पद्धतीने  मूर्ती हटवून तुम्ही काय सिद्ध करु पाहताय, असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी केला.

तसेच अशा कृत्याचा छत्रपती  शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून सहन करणार नसल्याचंही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

बुलडोझरने पुतळा हटवल्याने भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांनीही निषेध केला. ते याबाबत ट्विटद्वारे व्यक्त झाले.

शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत.  शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्थान असल्याचं शिवराज सिंह चौहान म्हणाले.

शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. हरकत होतीच तर सन्मानपूर्वक पद्धतीनेही पुतळा हटवता आला असता. पण हे सरकार महापुरुषांचा अपमान करण्यात गर्व समजते, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान गेल्या महिन्याभरात वादग्रस्त पुस्तकामुळे महाराष्ट्रात तीव्र संताप पाहायला मिळाला होता.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *