Tue. Aug 3rd, 2021

औषध आणायला गेलेल्या युवकाला जिल्हाधिकाऱ्याकडून मारहाण

छत्तीसगड: छत्तीसगडच्या सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये ते टाळेबंदीच्या काळात बाहेर पडलेल्या एका तरुणाला कानाखाली मारताना दिसून येत आहेत. तसेच या युवकाचा मोबाईलही त्यांनी जमिनीवर आपटून फोडल्याचे यात दिसून येत आहे.

आपण औषधे आणायला चाललो असल्याचेही हा तरुण वारंवार सांगत होता,मात्र त्याचे काही ऐकून न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला केलेल्या मारहाणीचा सध्या सर्व स्तरातून निषेधकेला जात आहे. यानंतर या जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती देत माफी मागितली आहे.

छत्तीसगडच्या सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्या वर्तनाचा आयएएस असोसिएशनने निषेध केला आहे.असोसिएशनने ट्वीट करून म्हटले आहे की, ‘हे अस्वीकार्य आहे आणि या सेवेच्या मूलभूत तत्त्वे आणि शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. विशेषत: या कठीण काळात सहानुभूती दाखविली पाहिजे’ अशी प्रतिक्रिया आयएएस असोसिएशनने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *