Fri. Oct 22nd, 2021

छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांना घाबरवण्यासाठी स्फोट

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली. नक्षल क्षेत्रात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. इतर ठिकाणी सकाळी 8 ते 5 पर्यंत मतदान होईल.

छत्तीसगड विधानसभेच्या 90 पैकी 18 जागांवर आज पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. ज्यामध्ये बस्तर मधील 12 तर राजनांदगाव मधील 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्याकरिता पोलीस आणि सुरक्षा दलाचे सव्वा लाख जवान तैनात करण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात 31 लाख 79 हजार 520 मतदार 4 हजार 336 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 16 लाख महिला मतदार तर 15 लाख 59 हजार पुरुष मतदार, 89 तृतीयपंथी मतदार असणार आहेत.

सकाळी 7 च्या दरम्यान छत्तीसगडमध्ये मतदारांना घाबरवण्यासाठी नक्षलवाद्यांकडून आईईडी स्फोट घडवण्यात आला. दंतेवाडा जिल्ह्यातील कटेकल्याण भागात ही घटना घ़डलीये. स्फोटानंतर कटेकल्याण भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *