Wed. Aug 4th, 2021

रायपूरमधील राजधानी रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागून पाच रुग्णांचा मृत्यू

रायपूर : कोरोनामुळे देशात परिस्थिती ही चिंताजनक आहे. शिवाय अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना या होत असल्याचं दिसून येते आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये असणाऱ्या राजधानी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डला शनिवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार केला जात होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच या रुग्णालयात सुमारे ५० रुग्णांवर उपचार सुरू होते.

आग लागल्याचे समजताच रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. मात्र, या दुर्घटनेत पाच रुग्णांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आणि मृताच्या नातेवाईकांचे सांत्वनही केले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *