Sun. Jun 20th, 2021

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केल्याचे म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली.

या भेटीदरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

मात्र ट्विटमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नसून 16 जून पर्यंत विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब जानवे आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सांगितले आहे.

त्यामुळे आता 14 जून ऐवजी 16 जून रोजी विस्तार होणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *