Fri. Aug 6th, 2021

मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन कक्षाला भेट; तातडीने पाच हजार अर्थसहाय्य देण्याचे निर्देश

मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिकुटुंबाला पाच हजार अर्थसहाय्य तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली आपत्कालीन कक्षाची भेट –

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट घेतली.

यावेळी पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार अर्थसहाय्य तातडीने द्यावे तसेच उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने उपलब्ध करण्यात यावे असेही आदेश देण्यात आले आहे.

गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम राबवावी तर रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहे.

औषधांची फवारणी, पूरपरिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन आर्थिक मदत आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबत सूचना दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *