Sat. Mar 28th, 2020

तारापूर स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पालघरमधील तारापूर औदयोगिक क्षेत्रात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी स्फोटाताली मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. याबाबतचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तसेच जखमींना सर्व प्रकारने वैद्यकीय साहाय्य पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बचाव कार्यावर मुख्यमंत्री स्वत: लक्ष देऊन आहेत. बचावकार्यासाठी एनडीआरफची मदत घेतली जात आहे.

हा स्फोट इतका भयंकर होता की, जवळील 4-5 किमीचा भाग हादरला.

दरम्यान मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *