Fri. Jan 28th, 2022

‘मुख्यमंत्र्यांनी केले मलिकांचे कौतुक, आम्ही कोणालाही अंगवार घेण्यास तयार’ – संजय राऊत

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप करत आहेत. मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना आरोपांच्या जाळ्यात ओढले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मलिकांना पाठिंबा दर्शवत भाजपवर निशाणा साधला आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांचे कौतुक केले असून, आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. भाजपवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, ईडी, सीबीआय, आयकर विभाग राज्यसरकारमधील नेत्यांवर ज्या पद्धतीने छापे टाकत आहे, जसे की ते भाजपचे नोकर असावे. राज्यात काय सुरू आहे, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. त्यामुळे २०२४नंतर परिस्थिती बदलणार असून जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मलिकांना पाठिंबा दर्शविला आहे, त्यामुळे या लढाईत नवाब मलिक एकटे नाहीत. आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *