Fri. Jun 21st, 2019

बारामतीमध्ये कमळ फुलवणार- मुख्यमंत्री

399Shares

दानवेंनी जी 43 वी जागा जिंकणार असं सांगितली ती जागा ‘बारामतीची’ असणार आहे.

गेल्या वेळेस चूक झाली,  मात्र यंदा ‘बारामतीत कमळच फुलणारचं असा विश्वास मुख्यमंञ्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत.

भाजपासाठी विकास महत्वाचा

 • देशाच्या विकासाचा एकही दिवस वाया घालवू शकत नाही.
 • हे वर्ष भारताच्या आयुष्यातले खुप महत्वाचं वर्ष आहे.
 • या वर्षांमध्ये भारतानं विकासाची गती राखली तर अमेरिका आणि चीनलाही मागे टाकेल
 • आतापर्यंत खूप वर्ष वाया घालवलीत, आपण आता वेळ वाया घालवू शकत नाही.
 • आम्ही भारताच्या भविष्यासाठी लढतोय. स्वत:च्या फायद्यासाठी लढत नाही.

निर्णय घेणारं सरकार हवं

 • नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आपल्याला मिळणार नाही.
 • मोदीचं भारताचा विकास करु शकतात
 • देशात काही जण मुलाचे पुनर्वसनाच्या प्रयत्नात आहेत. नाव न घेता सोनिया गांधींवर टीका केली

दानवेंनी जिंकणार असं सांगितलेली 43 वी जागा बारामतीचीचं – मुख्यमंञी

 • आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ४३ जागा जिंकणार आहे.
 • यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार आहे.
 • बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना मार्गदर्शन केले.
 • यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे आणि जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार उपस्थित होते.

 

 

 

399Shares

Leave a Reply

%d bloggers like this: