निकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा विधानसभा निकालापूर्वी केदारनाथच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नीसह केदारनाथ यात्रेला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री केदारनाथ यात्रेवर –

विधानसभा निकाल लागण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नीसह केदारनाथला भोलेनाथचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले.

लोकसभा निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा केदारनाथ यात्रेवर गेले होते.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केदारनाथला दर्शन घेण्यासाठी गेले असल्याचे म्हटलं जात आहे.

केदारनाथ येथे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केली आणि त्यानंतर फोटोही काढले आहेत.

महाराष्ट्र आणि हरियाणात २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार असून सकाळी ८ वाजेपासून मोजणीला सुरुवात होणार आहे.

या दोन्ही राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ ध्यान धारणा केली होती.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर निवडून येतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version