Fri. Sep 30th, 2022

‘मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीत की महाराष्ट्रासाठी ?’

बुधवारी मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. आता ते महाराष्ट्रासाठी गेलेत की, स्वतःसाठी गेले आहेत. हे आम्हासाला अजून माहीत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरुनही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणासंदर्भात अद्यापही शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, ‘वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणासंदर्भात अद्यापही सरकारकडून कोणतंही अधिकृत उत्तर आलेले नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आवाज उठवल्यानंतर चौकशीची धमकी दिली जाते. अजूनही वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेले? याबाबत अद्यापही राज्यसरकारकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेले  नाही.’

‘विरोधी पक्षांनी हे दोन मुद्दे वेदांता-फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या खोके सरकारनं जे काही एमआयडीमध्ये प्रकल्प आलेले. जे पेडिंग असून रिव्ह्यू होत होते, ज्यांच्यावर स्थगिती दिली होती. त्या सर्व प्रकल्पांवरील स्थगिती उठवण्याचा विचार सुरु आहे. याबाबतही कुठेच स्पष्ट करण्यात आलेलं नाही. काही प्रसार माध्यमांवर ही बातमी आली होती. कोणतीही यादी देण्यात आलेली नाही’, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

1 thought on “‘मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीत की महाराष्ट्रासाठी ?’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.