Mon. Jan 24th, 2022

‘मुख्यमंत्र्यानी पदभार दुसऱ्या कोणाकडे सोपवण्याची गरज’ – चंद्रकांत पाटील

मुंबै बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्षपदी भाजपाचे विठ्ठल भोसले विजयी झाले आहेत. या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मविआवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची काळजी आहे. त्यांची तब्येत चागंली होण्याची आमची इच्छा आहे. मात्र राज्यात इतके प्रश्न आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदभार दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझ्या आणि पक्षाच्या तब्येतीची काळजी करू नये, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मुंबै बँकेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला, मात्र शिवसेनेचा उपाध्यक्ष झाला नाही, त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागून वारंवार तोंड फोडून घेत आहेत तर राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी मते लागतात याची गोळाबेरीज करण्याचा राष्ट्रवादीचा फक्त प्रयत्न असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी लगावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *