Wed. Oct 27th, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून अयोध्या दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यादेखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

उद्धव ठाकरे अयोध्येला निघण्यासाठी मुंबई विमानतळावर सकाळी 9 वाजता पोहचणार आहेत. दुपारी अडीच वाजता लखनऊला पोहतचील. यानंतर लखनऊ ते अयोध्या गाडीने प्रवास करतील.

दुपारी 3.30 वाजता अयोध्येत मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता उद्धव ठाकरे रामललाचे दर्शन घेतील.

महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत.

दर्शन घेणार, आरती रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेणार आहेत.

शरयु आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही शरयु आरती रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भव्य महाआरतीचे आयोजन केलं आहे.

अयोध्या दौऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी आज शनिवारी साडे अकरा वाजता श्रीराम मंदिर इथं ही महाआरती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *