Thu. Jan 27th, 2022

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज विधानसभेत अनेक मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी कर्जमाफी संदर्भातदेखील मोठी घोषणा करण्यात आली.

शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करणार असल्याची घोषणा केली. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची थकीत कर्जमाफी करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

नववर्षातील मार्च महिन्यापासून या कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे. कर्जमाफीची रककम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते फडणवीसांकडून या घोषणेचा निषेध करण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे म्हणाले होते. मग फक्त 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा का केली ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांच्या आर्थिक मदतीचं आश्वासन पाळलं नाही. ही कर्जमाफी पुरेशी नसल्याचं फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील इतर मुद्दे

> यवतमाळसाठी विशेष निधीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
> कोणताही अनुशेष बाकी ठेवणार नाही
> प्रकल्पांना स्थगिती नव्हे, तर केवळ सुधारणा
> जमशेदपूर भिलाई सारखा स्टील प्रोजेक्ट पूर्व विदर्भात उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
> कामे स्थगितीने नाही तर गतीने करू. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एकत्र येऊन काम करू
> कुठल्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही
> गोसेखुर्दचं काम पूर्ण करणार
> संपूर्ण ताकदीनिशी विदर्भाचे प्रश्न सोडवू
> अधिवेशनात भाषणादरम्यान कुणी दुखावलं तर माफी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *