Tue. Jan 18th, 2022

‘या’ मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

मनसेचा महामोर्चा आज रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या महामोर्च्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत पोहचले होते. मोर्च्यानंचर या आझाद मैदानावर राज ठाकरेंनी भाषण केलं.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हिंदुत्व आणि बदललेल्या झेंड्यावरुन टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच हिंदुत्व असल्याने मला सिद्ध करण्याची गरज नाही.

आमचा पक्ष कधीही झेंड्याचा रंग बंदलणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एक माणूस एक झेंडा हे धोरण आमचं ठरलंय. आमचं हिंदुत्व हे जगाला माहिती आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृहावर आज शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलं असं होत नाही. मरेपर्यंत भगवा सोडणार नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान २३ जानेवारीला झालेल्या अधिवेशनात मनसेने राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले होते.

तसेच निवडणुकीच्या काळात राजमुद्रा असलेला झेंडा न वापरण्याची सूचना राज ठाकरेंनी केली होती. तसेच याच अधिवेशनात मनसेने हिंदुत्वाची कास धरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *