जीव धोक्यात घालून तिरंगा वाचवणाऱ्याचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

जीव धोक्यात घालून तिरंगा वाचवणाऱ्या तरुणाचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार करण्यात आला आहे. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कुणाल जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि शिवाजी महाराजांची प्रतीमा देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबईत आज १९ फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अशोक चव्हाण यांनी जाधव यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलावून घेतले.
मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना कुणाल जाधव यांचा अल्पपरिचय करुन दिला.
कुणाल जाधव यांनी आदराने तिरंगा उतरवल्याची माहिती अशोक चव्हाण यांना मिळाली . यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी काल १८ फेब्रुवारीला ट्विटद्वारे कुणाल जाधव यांच्या या कृतीची प्रंशसा केली होती.
मुंबईतील माझगावमध्ये १७ फेब्रुवारीला जीएसटी भवनला आग लागली होती. या आगीत इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्याला भीषण आग लागली होती.
आगीचे मोठ्या प्रमाणात लोट निघत होते. अशा परिस्थितीत शिपाई कुणाल जाधव याने तिरंगा खाली उतरवला होता.
इमारतीच्या ९ व्या मजल्यावर हा तिरंगा होता. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कुणाल जाधवने तिरंगा खाली उतरवला होता.
कुणाल जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून जीएसटी भवनात कार्यरत आहेत.