Jaimaharashtra news

हिंगणघाट प्रकरण : अपराध्याला शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही – मुख्यमंत्री

वर्ध्यातील हिगंणघाट जळीत कांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर राज्यभरातून तसेच पीडितेच्या गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

विविध क्षेत्रातून या विकृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

वर्णन करता येणार नाही, इतकी भयानक ही घटना आहे. सर्वांनी धीर धरा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अपराध्याला शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही.

तुमच्या सगळया भावनांशी मी सहमत आहे. पण तुमच्यातून वेडं वाकडं घडू देऊ नका. आपण सर्व सोबत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेत राज्यात अशा घटना घडवणाऱ्यांना थारा नाही.     

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आंधप्रदेश पेक्षा कडक कायदा करणार.   

या आरोपीला गुन्हा सिद्ध करुन फासावर लटकवणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या प्रकरणाबद्दल महाराष्ट्र कोणत्याही प्रकारे द्या, माया दाखवणार नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version