Sun. Sep 19th, 2021

महानगरी मुंबई गुरुवारपासून राहणार अंशत: लॉकडाऊन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं हे पाऊल उचलंल आहे. गुरुवारपासून महानगरी मुंबई अंशत: लॉकडाऊन राहणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. याेळेस मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

राज्य शासनाचे सरकारी कर्मचारी कार्यालयामध्ये दिवसाआड एकूण संख्येच्या ५० टक्के कर्मचारी येतील. तसंच सार्वजनिक वाहतून व्यवस्थेबद्ददलही सरकारने काही निर्णय घेतले आहे.

उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो, एसटी बसेस, खासगी बस, या आणि यासारख्या ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के कमी प्रवाशांनी चालवण्याची सूचना केली आहे.

यानुसार आजपासून (गुरुवार) बेस्ट बसमध्ये स्टॅंडिग प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नसेल. म्हणजेच बसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. याबाबत बेस्ट प्रशासनाकडूनही ट्विट करण्यात आलं आहे. बसमध्ये उभे राहून कमाल १८ लोकांना उभं राहून प्रवास करता येतो.

मुंबईतील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होतील. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष आणि विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामग्री देखील उपलब्ध आहेत.

क्वॉरंटाईन असलेल्यांना आवाहन

ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल.

अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये

जनतेने जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *