Wed. Oct 5th, 2022

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी भरला उमेदवारी अर्ज

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच गोरखपूर नगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘२०१९च्या निवडणुकीत देशातील आणि जगातील सर्व राजकीय विश्लेषकांचा विश्वास होता की, युपीमध्ये भाजपचे काय होईल? तेव्हा अमित शहा म्हणायचे की ६४-६५पेक्षा कमी जिंकणार नाही. भाजपने येथे ६४ जागा जिंकून युतीचा पराभव केला होता. आम्ही कोणताही भेदभाव न करता विकास प्रकल्प पुढे नेले आहे,’ असे ते म्हणाले. तसेच, राजकीय भाष्य हा वेगळा विषय आहे. ५ वर्षात सरकार आणि संस्थेने भेदभाव न करता सर्वांच्या विश्वासाच्या आदर केला आहे आणि सुरक्षिततेची हमी दिली आहे.

तसेच गृहमंत्री अमित शहा म्हणाले, उत्तर प्रदेशची जनता भाजपसोबत आहे. यावेळी पुन्हा ३०० जागा भाजप जिंकणार आहे. तर विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.