Tue. Aug 9th, 2022

मुख्यमंत्र्यांकडून बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची खाती काढून घेतली आहे. जनहिताची कामे अडकून राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांच्या खात्यांचं फेरवाटप केले आहे. यात मंत्री, राज्यमंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप केलं आहे. सध्या अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.

बंडखोर आमदार मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खातं सुभाष देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खातं आदित्य ठाकरेंकडे दिलं आहे. तर गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग हे खातं अनिल परब यांच्याकडे देण्यात आलं आहे. दादाजी भुसे यांच्याकडचं कृषी आणि माजी सैनिक कल्याण हे खातं, तसंच संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खातं शंकर गडाब यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांचं खातं आदिती तटकरेंकडे सोपवण्यात आले आहे.

सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणं, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामं सुरळीतपणे पार पाडावी त्यात काही अडथळा येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.