Jaimaharashtra news

मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना दत्तक घ्यायच्या मुलाची निवड करता येणार नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे दत्तक घ्यायच्या मुलाची निवड करता येणार नाही.

 

दत्तक प्रक्रियेचे समन्वय करणाऱ्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संस्थेतर्फे प्रत्येक इच्छुकास फक्त एकच मूल दत्तक घेण्यासाठी देऊ केले जाईल आणि  ते मूल स्वीकारणे किंवा नाकारणे एवढाच

पर्याय इच्छुकास उपलब्ध असेल.  

 

हा नवा नियम 1 मेपासून लागू होईल. मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना  सरकारच्या दत्तकविषयक पोर्टवर नोंदणी करावी लागते. अशा नोंदणीकृत इच्छुक पालकांना आत्तापर्यंत

दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन मुलांचा पर्याय दिला जायचा आणि त्यापैकी एक मूल त्यांना निवडता येत असे.

 

आता ही प्रथा बंद होईल आणि पालकांना प्रत्येकी फक्त एकच मूल देऊ केले जाईल.

Exit mobile version