Jaimaharashtra news

शालेय वस्तू खरेदीसाठी लहनगी मुलगी मागतेय भीक

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी

एकही मुलं शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्यशासन विविध योजना राबून शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रयत्न कोठे तरी कमी पडतात परभणीतील जिंतूर तालुक्यातील बस स्थानक परिसरात एक मुलगी शालेय शिक्षणाच्या साहित्यासाठी अगदी रस्त्यावर भीक मागताना आढळली.

 

इयत्ता सहवीत ती मुलगी शिकते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने तिच्या जवळ इतर विद्यार्थ्यासारखे दप्तर, वह्या, गणवेश नव्हता. सर्व शिक्षा अभियानमधून पुस्तके तर मिळाली. मात्र, दप्तर आणि वह्या घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.

 

दप्तरासाठी आणि इतर शालेय साहित्यासाठी पर्याय नसल्याने तिने भिक मागून शिकावे व स्वतःच स्वतःच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था करावी अशी वेळ त्या लहानग्या नम्रतावर आली.

 

महाराष्ट्र शासन शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते. स्वयंसेवी संस्था यासाठी काम करते पण त्यांच्या कामात कोठे तरी कमी पडत असल्याचं दिसून येतं.

Exit mobile version