Wed. Oct 5th, 2022

मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत

कोकणातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याचे दिसत आहे. मिरची पिकावर हुरडा नावाच्या  किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उभे पीक नष्ट झाले आहे. कृषी विभागाच्या सल्ल्याने किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करूनही शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आलेच नाही. मिरचीचे झाड सुकल्याने आलेली मिरची ही काळपट आणि पांढरट रंगाची झाली आहे.

मिरची उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत आल्याचे दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेतले जाते.मालवणी जेवणात या लाल तिखट लाल रंगाच्या मिरची पासूनच मालवणी मसाला बनविला जातो मात्र अवेळी थंडी, पाऊस आणि कडाख्याचे ऊन या बदलत्या वातावरणाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे मिरची पीक उभे नष्ट झाले आहे सदरचे पीक हे दोन महिने उशिरा आले मात्र त्यानंतर आलेले उत्पादनही निकृष्ट दर्जाचे आले आहे.

ऐनवेळी मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी पूर्णतः अडचणीत आले आहेत. प्रत्यक्षात मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिरची उत्पादनातून लाखोचा फायदा मिळतो. मात्र या परिस्थितीमुळे मिरची उत्पादक शेतकऱयाला याचा मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनातून पावसाळ्यात शेतकऱ्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो तसेच मुलाच्या शिक्षणाचा खर्च या मिरची उत्पादनातुनच केला जातो. निसर्गाच्या अवकृपेमुळे तळकोकणातील मिरची उत्पादक पूर्णतः आता अडचणीत सापडल्याचे दिसत आहे तर चाकरमानी आणि मालवणी यांना मात्र आपल्या जेवणात मालवणी मसाला मात्र चाखता येणार नाही. शासनाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान  भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून
होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.