Fri. Nov 15th, 2019

पुतळा बांधून भारताने गमावली बाजी, चीनला मात्र मिळणार हवा ताजी!

भारताने सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्च करून गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा जगातला सर्वांत उंच पुतळा उभारला. मात्र या पुतळ्यावर केलेल्या खर्चावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. या पुतळ्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे, तर भारताला आर्थिक सहाय्य करणाऱ्या ब्रिटनच्या खासदारांनीही भारताने पैसे वाया घालवल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा संबंधित बातमी-‘स्टेच्यू ऑफ युनिटी’ वर ब्रिटिश खासदाराची प्रतिक्रिया… ‘नॉन सेन्स’!

सरदार पटेल यांचा पुतळा पाहाण्यासाठी जर दर दिवशी ताज महल पाहायला येणाऱ्या पर्यटकांइंतकी जरी गर्दी झाली, तरी पुतळ्याचा खर्च वसूल व्हायला 150 वर्षं लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ताज महल पाहायला दिवसाला 40,000 ते 70,000 लोक येतात. एवढ्या प्रमाणावर लोक दर दिवशी सरदार पटेल यांचा पुतळा पाहायला येतील का, असा प्रश्न आहे.

या भव्य स्मारकाऐवजी एवढ्या रक्कमेतून इतर अनेक गोष्टी करता येणं शक्य असल्याचं वारंवार म्हटलं जातं. एवढंच नव्हे, तर पुतळ्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर सहाय्य घेतल्याचीही टीका होतेय. पण याच चीनने आपल्याकडील निधी मात्र आपल्या देशाच्या नागरिकांच्या आरोग्यावर खर्च केलाय.

3E1SYJ3TSpym_r3bFzuva-MtN74DMbb9BnfDRpX_9TU.jpg

चीनने जगातला सर्वांत मोठा वायूशुद्धीकरण टॉवर उभारलाय. चीनच्या झियान या शहरामध्ये 100 मीटरचा एअर प्युरिफायर म्हणजेच वायू शुद्धिकारक उभारण्यात आलाय. 10 चौरस कोलमीटर परिसरातील हवेचं शुद्धीकरण करण्याचं काम हा वायू शुद्धीकारक करणार आहे.

हा वायू शुद्धिकारक टॉवर उभारण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरलं आहे.

मोठ्या प्रमाणावर ग्रीन हाऊसेस यासाठी बांधण्यात आली आहेत.

सौर ऊर्जेचा वापर करून हे वायू शुद्धकारक हवेतील धुरकं (स्मॉग) शोषून घेतं. ही हवा विविध फिल्टर्समधून शुद्ध करून अखेर बाहेर सोडली जाते.

दर दिवशी 10 दशलक्ष क्युबिक मीटर हवा या टॉवरमधून सोडण्यात येणार आहे. सर्वांत जास्त प्रदूषण असणाऱ्या दिवशी या टॉवरचा वापर होईल.air_purifier.jpg

स्मॉग (धुरकं) ही जगभरातील गंभीर समस्या बनली आहे. नवी दिल्ली येथे स्मॉगमुळे ऑड- इव्हनचा फॉर्म्युला वापरून वाहनांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र त्याने समस्येचं पूर्ण निवारण झालेलं नाही. चीनमध्येही 1.8 दशलक्ष लोकांचा धुरक्यामुळे मृत्यू झाला आहे. मात्र चीनने याची गंभीर दखल घेऊन इंजीनिअर आणि शास्त्रज्ञांची टीम कामाला लावली. शुद्ध हवा मिळावी यासाठी चीनने 2005 साली 7.5 बिलीयन डॉलर्स तर 2015 साली 101 बिलियन डॉलर्स यासाठी गुंतवले.

Smog.jpg

 

भारताला ही गोष्ट करणं सहज शक्य झालं असतं. मात्र त्या पैशांत असं तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी भारता सरकारने तेवढा पैसा जगातल्या उंच पुतळ्यावर खर्च केला. त्या पुतळ्यासाठीही चीनचंच सहाय्य भारताने घेतलं. तसंच भारतीय हवेचं शुद्धीकरण करण्याऐवजी चीनचेच फटाके उडवून वातावरण आणखी प्रदूषित करण्यात येत आहे.

 

यामुळे भारताने देशाला शुद्ध आणि प्रदूषणमुक्त हवा पुरवण्याची संधी गमावली आहे. चीनने मात्र वीज बचतीसाठी कृत्रिम चंद्र निर्माण करण्यापासून ते जगातला सर्वांत मोठा वायू शुद्धिकारक टॉवर उभारण्यापर्यंतच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बाजी मारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *