Tue. Jun 28th, 2022

लडाख येथील चुशुल सीमेजवळ चीनने तीन मोबाईल टॉवर्स उभे केल्याचे समोर आले आहे. याबाबतची छायाचित्रे स्थानिक नगरसेवक काेंचाेक स्टँझिन यांनी पाेस्ट केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पॅंगॉंग तलावावर चीनने अवैध पुलाचे बांधकाम केल्याची घटना ताजी असतानाच आता चीनची आणखी एक कुरापत समोर आली आहे.

लडाखमधील पॅंगॉंग तलावावर चीनने बेकायदेशीररीत्या पुलाचे बांधकाम केले होते. हे प्रकरण झाले आणि आता लडाखच्या सीमेवर तीन मोबाईल टॉवर्स उभे केल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनने चुशुलच्या सीमेजवळ मोबाईल टाॅवर लावले आहेत. याबाबतची छायाचित्रे स्थानिक नगरसेवकाने पाेस्ट केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही बांधकामे चीनने १९६२ पासून अवैधरीत्या ताब्यात घेतलेल्या भागात झालेली आहेत. लडाखच्या स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे चुशुल येथील नगरसेवक काेंचाेक स्टँझिन यांनी माेबाईल टॉवर्सची छायाचित्रे ट्विटरवर पाेस्ट केली आहेत.

या घटनेची माहिती ट्विटच्या माध्यमातून देऊन, ‘पँगाँग तलावावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीनने आता भारतीय हद्दीच्या अतिशय जवळ ३ माेबाइल टाॅवर्स उभारले आहेत. हा चिंतेचा विषय नाही का? आमच्याकडे गावात ४ जी सुविधा नाही. माझ्या मतदारसंघातील ११ गावांमध्ये ४ जी सेवा नाही.’ असं पॅंगॉंग चुशुल प्रांताचे नगरसेवक म्हणाले आहेत. दरम्यान , आता या प्रकरणी भारत सरकार काय पाऊले उचलतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.