Mon. Dec 16th, 2019

पुन्हा एकदा चीनची भारताला युद्धाची धमकी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

डोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. मोदी सरकारची ही भूमिका अशीच कायम राहिल्यास युद्ध निश्चित असल्याचं चीनने म्हटलं.

 

ग्लोबल टाइम्सने चिनी संरक्षण तज्ज्ञांचा हवाला देऊन ही धमकी दिली. चीनच्या संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी दोन आठवड्यांच्या आत डोकलाममध्ये भारतीय लष्करावर कारवाई करू शकते. यामुळे भारत चीन या दोन्ही देशांमधले संबंध आता आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *