Wed. Oct 5th, 2022

भारतीय हवाई दलात शक्तिशाली चिनुक हेलिकॉप्टरचा समावेश

पुलवामा हल्ला झाला आणि भारत आणि  पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू असतात.यावरती आळा घालण्यासाठी भारतीय हवाई दलात आता अत्याधुनिक अशा चिनुक हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद वाढणार असून पाकिस्तानच्या सीमेवर हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे. यामुळे सीमेवरील सुरू असणाऱ्या पाकिस्तानच्या कुरापतींना लगाम बसणार असं हवाऊ दलाकडून सांगण्यात येत आहे.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस धनोआ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात चार चिनुक हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल करण्यात आले आहेत. ‘हे चारही हेलिकॉप्टर राष्ट्राची संपत्ती आहे. सुरक्षेच्या पातळीवर देश सध्या अनेक आव्हानांचा सामना करत असून चिनूकची हवाई दलात एन्ट्री झाल्याने ते गेम चेंजर ठरणार आहे, असं मत धनोआ यांनी व्यक्त केलं आहे.

यावेळी धनोआ यांनी राफेल विमानांचाही उल्लेख केला. राफेल विमान हवाई दलाच्या ताफ्यात आल्यानंतर पाकिस्तानचे  कोणतेही विमान नियंत्रण रेषेवर आणि सीमेवरही येणार नाही. राफेलमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढेल. त्यामुळे पाकिस्तान आपल्याला प्रत्युत्तरही देऊ शकणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

चिनुक हेलिकॉप्टरची  वैशिष्ट्ये:

11 हजार किलो शस्त्रास्त्र आणि सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे.

  हे मल्टी मिशन हेलिकॉप्टर बोइंग कंपनीने तयार केलं आहे

हे हेलिकॉप्टर हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये  उपयोगी ठरणार आहे

खोऱ्यांमध्ये आणि छोट्या हेलिपॅडवर सुद्धा हे हेलिकॉप्टर लँड करता येतं

या हेलिकॉप्टरचा वापर आतापर्यंत 19 देशांनी  केला आहे.

अमेरिकेच्या हवाई दलात 1962 पासूनच हे हेलिकॉप्टर दाखल आहे .

भारताने  15 चिनूक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला आहे.

खराब हवामानातही हे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकते, या हेलिकॉप्टरचा वेग ताशी 315 किलोमीटर एवढा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.