Mon. Jan 17th, 2022

“चिपी विमानतळामुळे पर्यटकांमध्ये तिप्पट वाढ होणार” – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिपी विमानतळाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात तिप्पट वाढ होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे विमानातळाची आवश्यकता आहे. तसेच लवकरात लवकर हे विमानतळ सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

चिपी विमानतळ उद्घाटन –

जिल्ह्यातून जाणारा रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाचा वेग वाढला आहे.

चिपी विमानतळाच्या परवानग्या मिळवण्यासाठी अनेक अडचणी आल्या.

मात्र केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या विशेष मेहनतीमुळे विमानतळाच्या परवानग्या मंजूर झाल्या.

या उद्घाटनसाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

नारायण राणे सुद्धा या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

तसेच लोकसभा निवडणुक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी उद्घाटन सोहळा उरकला असल्याची टीकाही करण्यात येत आहेत.

नारायण राणे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमानतळावरून सरकारवर घणाघाती टीकाही केली आहे.

माझ्या कारकीर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र अद्याप सराकरने पूर्ण केले नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

तसेच विमानतळाची बरीच कामे बाकी आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *